कागल : युवा नेतृत्व संग्राम लाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात ; सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा ; प्रभागातील बांधकाम कामगार लाभार्थ्यांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल शहरातील युवा नेतृत्व माजी नगरसेविका सौ. शोभा लाड यांचे चिरंजीव संग्राम लाड यांचा वाढदिवस प्रभागातील इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्य व सुरक्षा संच वाटप तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या शुभहस्ते या सर्व साहित्याचे वाटप व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार मुश्रीफ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संग्राम लाड यांनी केलेल्या सामाजिक कार्यक्रमाचे कौतुक करीत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचे भाषण झाले. माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कागल शहर अध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक सौरभ पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय ठाणेकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, शामराव पाटील, सुनिल माने, नवाज मुश्रीफ, अर्जुन नाईक, इरफान मुजावर, विष्णू कुंभार, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अमोल आंबी यांनी केले. भर पावसात कार्यकर्ते प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.