ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी ओसरू लागले ; मुरगुड – मुदाळतिठ्ठा मार्गावरील वाहतूक सुरू

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यामुळे पूरस्थिती शुक्रवारीही सायंकाळी पर्यंत  जैसे थे होती. दरम्यान शनिवार सकाळ पासून पाणी ओसरू लागले आहे. मात्र पाणी अत्यंत धिम्या गतीने ओसरत आहे.

दरम्यान मुरगुड – मुदाळतिठ्ठा महामार्गावरील निढोरी येथील म्हारकीच्या पुलाजवळील रस्त्यावरील पुराचे पाणी कमी झाल्याने येथील वाहतूक चालू झाली आहे. एकंदर पावसाची उघडीप आणि पुराचे वाढणे कमी झाल्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

धरणाचे दरवाजे चालू बंद होत असल्यामुळे परिसरात पुराचे पाणी तुंबून राहिले आहे त्यामुळे मुरगुड परिसरातील हजारो एकर ऊस शेती पीक कुजण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने पुढाकार घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी परिसरातील पूरग्रस्तांची मागणी आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks