सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राज्यातील सहकारी संस्थांच्या सन 2020-21 या अर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी किंवा ओएव्हिएमद्वारे घेण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-
१) संबंधित प्रांगण/लॉन/ सभागृहामधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर.
२) खुल्या प्रांगण / लॉनमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभांस उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.
३) बंदीस्त सभागृहामध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादीत असेल.
४) कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या सहकारी संस्थेची सभासद संख्या 200 इतकी आहे त्यांनी उपरोक्त नमुद केले प्रमाणे बंदीस्त सभागृह, प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत त्यांची सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 संसर्गाचे शिष्ठाचार व नियम काटेकोरपणे पाळून घ्यायची आहे.
5) कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या सहकारी संस्थेची सभासद संख्या 200 पेक्षा जास्त आहे त्या सहकारी संस्थेनी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष न घेता फक्त व्हिसी अथवा ओएव्हीएमद्वारेच आयोजित करायची आहे.
6) कोणत्याही संस्थेने वैयक्तीकरित्या वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यास इकडील कार्यालयाकडे परवानगी मागणी करु नये.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.