नेसरीचे सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा यांना पुरस्कार प्रदान

नेसरी प्रतिनिधी :
नेसरीचे सुपुत्र व सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा याना नुकताच माहे ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीसाठी सर्वोत्कृष्ठ अपराधसिद्धी पुरस्कार प्राप्त झाला असून सदर पुरस्कार अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेशकुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन प्रदान करणेत आला.
अप्पर पोलीस महासंचालक ,गुन्हे अन्वेषण विभाग,महाराष्ट्र राज्य यांनी शिफारस केलेल्या एकूण 8 गुन्ह्यांची निवड पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी केली.
सदर पुरस्कार औरंगाबाद शहर अंतर्गत MIDC वाळुंज पोलीस ठाणे अंतर्गत उल्केखनिय कार्य केलेबद्दल रविकांत बुवा याना प्रदान करणेत आला सदर पुरस्कार प्रदान समारंभ पोलीस संशोधन केंद्र ,पाषाण रोड,चव्हाण नगर पुणे येथे पार पडला.
पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यामध्ये त्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस उपायुक्त परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून श्री रविकांत बुवा याना पुरस्कार प्राप्त झालेने नेसरी सह तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे