ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कौस्तुभ कुडाळकरची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेसाठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचालित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कौस्तुभ संतोष कुडाळकर याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कागलच्या डी. आर. माने कॉलेजवर झालेल्य कागल तालुकास्तरीय १७ वर्षांखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्यांने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याची नृसिंहवाडी, ता. शिरोळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये कागल तालुक्यातील पाच जणांच्या संघात कौस्तुभचा समावेश करण्यात आला आहे. त्याला वडील संतोष कुडाळकर व क्रीडाशिक्षक एकनाथ आरडे यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य पी. डी. माने व उपमुख्याध्यापक प्रा. रवींद्र शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले.