भुदरगड : कुंभारवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग

गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यातील कुंभारवाडीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत विक्रम शिवाजी पांगम यांचे प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घरातील सर्व साहित्य जळून खाक झालेले आहे
यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळाल्यामुळे त्यांच्याकडे आता उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही तरी या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने त्यांना योग्य ती मदत करावी असे सदर गावातील पोलीस पाटील नामदेव नार्वेकर यांनी सांगितले,
सदर घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी पांगम हे पाणी तापवण्यासाठी हिटरचा वापर करत होते, कारण सर्वसामान्यांना गॅस वापरणे आता मुश्कील झालेला आहे. हीटर लावलेली कळशी फ्रिजवर उलटली आणि त्यामुळे ही आग लागल्याची समजत आहे. तरी सदर कुटुंबाला प्रशासनाची मदतीची आशा आहे,