ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेस ४९ लाखाचा नफा : चेअरमन किरण गवाणकर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड (ता. कागल) येथील श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेला ४९ लाख २० हजाराचा नफा झाला आहे. १६ कोटी १० लाख ठेवी जमल्या आहेत, अशी माहिती चेअरमन किरण गवाणकर, संचालक सुदर्शन हंडेकर यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, संस्थेचा राखीव निधी १ कोटी ३७ हजार, ठेवी १६ कोटी १० लाख, कर्जे ११ कोटी ८७ लाख, गुंतवणूक ५ कोटी २३ लाख, उलाढाल ९३ कोटी, वसूल भागभांडवल ३१ लाख ८१ हजार, ऑडीट वर्ग अ (सन २०२०-२०२१), सभासदांना १३ टक्के लाभांश दिला जातो. यावेळी उपसभापती सौ. रोहीणी तांबट, संचालक प्रशांत शहा, साताप्पा पाटील, धोंडीबा मकानदार, किशोर पोतदार, नामदेवराव पाटील, शशिकांत दरेकर, प्रदिप वेसणेकर, यशवंत परीट, प्रकाश सणगर, संदीप कांबळे, सुरेश जाधव, महादेव तांबट, संचालिका सौ. संगीता नेसरीकर, सेवकवृंद उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks