ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पन्हाळा : जनसुराज्यला कोल्हापुरात धक्का!नगरसेविका यास्मिन मुजावर यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
पन्हाळा येथील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नगरसेविका सौ. यास्मिन फारुक मुजावर यांनी मंगळवारी रात्री (दि.३०) मुंबई येथे वर्षा निवासस्थानी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.पन्हाळा नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता असून जनसुराज्यचे माजी नगरसेवक फारूक मुजावर, अकतर मुल्ला, व यास्मिन मुजावर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधले. ही बाब रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पन्हाळ्यातील नागरिकांना समजली त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. जनसुराज्यच्या यास्मिन, फारुक मुजावर व अकतर मुल्ला या तिघांनी शिवबंधन बांधल्याने पन्हाळ्यात जनसुराज्यमध्ये फूट पडली असल्याची चर्चा सुरू रंगली आहे.