मुरगूड-निढोरी दरम्यान सुरू असणारे रस्त्याचे काम उंची न वाढवता करावे : नागरिकांची मागणी ; संतप्त नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निपाणी-फोंडा रस्त्याच्या निढोरी-मुरगूडदरम्यान सुरू असणारे काम मुरगूड गावभागातील नागरिकांनी शुक्रवारी बंद पाडले. रस्त्याची उंची न वाढवता हे काम करण्याचे ठरले असताना सुमारे अडीच फूट रस्ता भराव टाकून केला जात आहे. यामुळे वेदगंगा नदीचे पाणी मुरगूडमध्ये शिरण्याचा तसेच शेतात जास्त पाणी साचून नुकसान होण्याचा धोका आहे.
पुराच्या पाण्याचा धोका होऊ नये म्हणून निढोरीपासून यमगेपर्यंत रस्त्याची उंची न वाढवता हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचा ठरला होता, पण आहे त्या रस्त्यावर खडीचा भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे शहरातील संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी या ठिकाणी जात हे काम बंद पाडले. उंची न वाढवता हा रस्ता करावा, असे निवेदनही यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी संदीप भारमल, बबन बाबर, भिकाजी रामाणे, पृथ्वीराज कदम, यद्रवीर रावन, अमेय पाटील ,किरण मगदूम, विठ्ठल परीट, प्रकाश मेंडके, रणजित सावंत या प्रमुखांसह अन्य शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी या रस्त्यावर पसरलेली खड़ी एकत्र करण्याचे काम सुरू होते