पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या विकासात्मक नेतृत्वावर मतदारांचा पुन्हा एकदा विश्वास :राजे समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर प्रतिनिधी :
आज निकाल लागलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत मतदारांनी भाजप च्या बाजूने कौल दिला आहे.याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे झालेली अंमलबजावणी व सर्वसामान्यांच्या हिताच्या कारभाराची ही पोचपावती आहे. मतदारांनी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या विकासात्मक नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे.
आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिलेल्या या निवडणूकीत भाजपच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याची झलक यानिमित्ताने मतदारांनी दाखवून दिले आहे.
विशेषता महाराष्ट्रा लगत असलेल्या गोवा राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. त्यांनी आपल्या निवडणूक कौशल्य द्वारे या ठिकाणीही भाजपला अत्यंत चांगले मिळवून दिले आहे याबद्धल देवेंद्रजी यांचेही अभिनंदन!
तसेच ,त्या-त्या राज्यातील नेते व मतदार या सर्वांचे ही अभिनंदन करतो.