ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गडहिंग्लज : हडलगे येथील नेहा रोहित यांची ग्राम तहसील पदी निवड

नेसरी /पुंडलीक सुतार
हडलगे ता.गडहिंग्लज येथील सौ.नेहा रोहित राऊत यांची सोलापूर जिल्ह्यासाठी ग्राम तहसील पदी निवड झाली आहे त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.सौ.नेहा राऊत यांचे शिक्षण जयसिंगपुर कॉलेज जयसिंगपुर येथे बी.ए. पर्यंत झाले असून सदर पदासाठी झालेल्या परीक्षेत त्यांनी 174 इतके गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केलेआहे.
यासाठी त्यांना पती रोहित राऊत,सासरे रामचंद्र राऊत,सासू सौ.संगीता राऊत,आई सौ.जयश्री राऊत,वडील दिलीप राऊत यांची प्रेरणा मिळाली असल्याचे यावेळी सांगितले.