ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : लाच घेताना ‘महावितरण’चा सहायक अभियंता जाळ्यात

कोल्हापूर प्रतिनिधी :
महावितरणचा सहायक अभियंता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०) असे या अभियंत्याचे नांव आहे. ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांनी महावितरण ग्रामीण विभाग-२ अंतर्गत ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगची कामे केली होती. त्याची बिले मंजूर करण्यासाठी ते संशयित धर्मराज काशीदकर यांच्याकडे गेले होते. यावेळी त्याने त्यांच्याकडे लाचेची मागणी केली हाेती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला