राजे फाऊंडेशनच्या वतीने मुरगूडला उभारलेले कोविड सेंटर जनतेला फायदेशीर ठरेल ; सौ.नवोदिता घाटगे सरपिराजीराव घाटगे गूळ उत्पादक सोसायटीत २५ बेडचे सुसज्ज अलगीकरण कक्ष

मुरगूड, प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या वतीने मुरगूडला उभारलेले कोविड सेंटर जनतेला फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले.
राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन संचलित सर पिराजीराव घाटगे गुळ उत्पादक सोसायटी शिंदेवाडी येथे २५ बेडच्या अलगीकरण कक्षाचे उद्घाटन सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणे बरोबर या सामाजिक कार्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांनी आता पुढे येणे गरजेचे आहे. शिंदेवाडी प्रमाणेच गावोगावी कोवीड सेंटर उभारल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर त्या-त्या ठिकाणी वेळीच उपचार करणे सोयीचे होईल.
या अलगीकरण केंद्रामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नर्सिंग स्टाफ ची 24 तास सेवा उपलब्ध असणार आहे.रुग्णांना मोफत चहा नाश्ता व औषधोपचाराची सोय करण्यात येणार आहे .तसेच खबरदारीचा उपाय म्हणून एक ऑक्सीजन सिलेंडर सुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहे.
यावेळी सरपंच रेखा रमेश माळी, गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील, डॉ. संजय रामशे, डॉ. सचिन भारमल,शाहु कृषी चेअरमन अनंत फर्नांडिस,रामभाऊ खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील, रणजीत पाटील, अमर चौगुले, सुशांत मांगोरे, विजय राजिगरे, राहुल खराडे, विष्णू मोरबाळे, विजय गोधडे, प्रवीण चौगुले, राहुल मुरगूडकर, आक्काताई वंदूरे, छाया शिंदे आदी सह असंख्य नागरिक उपस्थित होते.
नागरिकांतून समाधान…
मुरगूड शहरापासून पूर्वेला असणारे हे कोवीड सेंटर हवेशीर आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळीच उपचार घेतल्यास कोरोना जवळही येणार नाही. राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन च्या वतीने शिंदेवाडीत अलगीकरण कक्ष सुरु केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे असे डॉ. संजय रामशे यांनी सांगितले.