बार्टी तर्फे छत्रपती शाहू कॉलेज कागल येथे संविधान साक्षरता अभियान अंतर्गत मुलांना निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

कोल्हापूर :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे विभाग कोल्हापूर तालुका कागल यांच्या वतीने संविधान साक्षरता अभियान अंतर्गत निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या कार्यक्रम आयोजन कागल तालुका बार्टी समतादुत किरण चौगुले यांनी केले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून. शिक्षण विस्तार अधिकारी मा सारिका कासोटे यावेळी बोलताना मुलांनी शालेय जीवन भरपूर कष्ट केले पाहिजे त्याशिवाय आपल्याला यश येणार नाही व विद्यार्थिनी स्वतःला शिक्षण बरोबर सामाजिक कार्यात अग्रभागी राहून कार्य केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले यावेळी त्यांनी बार्टीचा चा कामाचे कौतुक केले यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी सारिका कासोटे व बार्टीचे समतादुत किरण चौगुले, उपप्राचार्य बी के मडीवाल यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सर्टिफिकेट व पेन देऊन करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य बी के मडिवाल, एम बी पाटील,प्रा. एल. वी. शिंदे, एस एस पाटील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन बार्टी चे महासंचालक धम्मज्योती गजभिये कोल्हापूर समाजकल्याण विभाग चे सहायक आयुक्त मा.विशाल लोंढे, योजना प्रमुख उमेश सोनवणे कोल्हापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी मा.गणेश सवाखंडे यांचा मार्गदर्शन खाली करण्यात आले.