शनिवारी – रविवारी शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर :
गेली दोन वर्षांपासून कोरोनाचे भूत लोकांच्या मानगुटीवर येऊन बसलं आहे. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाला परिणाम भोगावे लागले. विद्यार्थ्यांना कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे आर्थिक परिसराती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षकांना मोठे आदेश दिले आहेत.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ही बातमी फार महत्त्वाची आणि आनंदाची आहे. विद्यार्थ्यांची पावणे दोन वर्षे वाया गेली आहेत. ती भरून निघाली पाहिजेत. शिक्षकांनी शनिवार-रविवार शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाचा पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार यांनी हे आवाहन केले. असे कार्यक्रम राज्यभरातील विविध शाळांमध्ये राबवला गेला पाहिजे, असंही त्यावेळी बोलताना पवार म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमाला अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. तर आता शिक्षणमंत्री यासंदर्भात काही निर्णय घेणार का ? यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.