ग्रामीण भागात फार्मर प्रोडूसर कंपनी निर्मित होणे गरजेचे; भाजपा तालुका उपाध्यक्ष सुनिल तेली यांचे कार्य कौतुकास्पद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन; शेणगांव येथे ४०० शेतकऱ्यांना प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप
शेतकरी स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून भांडवल तयार करून वाटचाल तयार करावी लागेल, आपण त्यात शेतकऱ्यांना मदत करू, असे ते म्हणाले.

गारगोटी प्रतिनिधी :
ग्रामीण भागात फार्मर प्रोडूसर कंपनी निर्मित होणे गरजेचे जेणेकरून उत्पादक शेतकर्यांना त्याचा फायदा होईल. प्रशासनाने चांगल्या पध्दतीने कार्य केले तर शेतकऱ्यांचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक नफा मिळला पाहिजे. शेणगांव मध्ये ४०० शेतकऱ्यांना प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ दिल्याबद्दल भाजपा तालुका उपाध्यक्ष सुनिल तेली यांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

शेणगांव ता भुदरगड येथे प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या प्रमाणपत्र वाटप प्रसंगी केले.येथील ४०० शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण दिल्याने त्यांना प्रत्येकी २ लाखाचा विमा कव्हरेज मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभियानामूळे सर्वसामांन्य गोरगरीब जनतेला अनेक सोयी सवलती मिळाल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. आमच्या राज्याच्या भाजपच्या सत्ता काळात २४ हजार कोटी पाणी प्रकल्पावर खर्च करता आल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी केवळ तीन दिवसाचे हे प्रशिक्षण घेवूनच थांबू नये तर पुढचे काहीतरी दिवस असे हे शिकावे लागतील.
शेतकरी स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून भांडवल तयार करून वाटचाल तयार करावी लागेल आपण त्यात शेतकऱ्यांना मदत करू असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना राधानगरी विधानसभा मतदार संघाचे युवा नेते राहूल देसाई म्हणाले की, कौशल्य विकास योजना हे अभियान शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगले आहे.सध्या गट शेतीची गरज आहे.शेतकऱ्यांनी केवळ ऊस आणि शेतीपुरतेच मर्यादित राहू नये.भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील शासन शेतकऱ्यासाठी ज्या काही येजना राबवेल त्या तळागाशापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण साऱ्यांनी करूया असे ते म्हणाले.
भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थीती कथन करण्याबरोबरच शेतकऱ्यांना संघटित करून चांगल्या पध्दतीची सेवा देण्यास वचनबध्द असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना तालुका कृषि अधिकारी किरण पाटील म्हणाले की, तालुका कृषि कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या सर्व योजना तयार आहेत.शेतकऱ्यांनी याबध्दल संपर्क साधावा व सतत मार्गदर्शन घ्यावे.शेतकऱ्यांना विविध योजनांची सविस्तर माहिती नेहमी दिली जाईल.
यावेळी भाजचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद गुरव यांवी विचार मांडले. प्रास्ताविकात सुनिल उर्फ देशभुषण तेली यांनी शेणगांव गावात कौशल्य विकास योजना ज्या नियोजनपुर्वक राबवली त्याची सविस्तर माहिती दिली. गेेले तीन महिने अथक परिश्रम घेवून शेतकऱ्यांना संघटित करून ज्या पध्दतीने या योजनेची प्रभावी अंमलबीजावणी केली त्या योजनेबध्दल शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबध्दल त्यांचे अभिनंदन केले.
सुरुवातीला आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.नंतर दिप प्रज्वसन झाले.आमदार चंद्रकांतदादा पाटील व मामन्यवरांचा ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार संपन्न झाला आज शेणगांव ता भुदरगड येथील कुमार भवन शेणगांव हायस्कूलच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थीत असलेल्या सुमारे ४०० महिला पुरूष शेतकऱ्यांना कौशल्य विकास योजनेचे प्रमाणपत्र आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व इतर मांन्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, शेणगांवचे ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार, अशोक येलकर, माजी उपसरपंच रघुनाथ कुंभार,नामदेव आबा भालदार, सुखदेव कुंभार, प्रकाश जाबशेट्टी, पंडित साळोखे, नंदकुमार वायचळ,दत्ता वायचळ, विनायक गुरव, पत्रकार मंगेश कोरे, सुभाष माने, अवधूत विभूते, शिवाजी कुंभार आदि शेकडो शेतकरी,महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी मांन्यवर उपस्थीत होते. स्वागत व प्रास्ताविक सुनिल तेली यांनी केले तर सुत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले.