पत्रकार संभाजी कांबळे समाज भुषण पुरस्कार प्रधान ; नाशिकच्या तेजस फाउंडेशनने घेतली कार्याची दखल

कुडूत्री प्रतिनिधी
तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातून पत्रकार संभाजी कांबळे यांना समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक दिग्दर्शिका मेघा डोळस व ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे व तसेच अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला…
गुडाळ ता.राधानगरी येथील पत्रकार संभाजी कांबळे हे गेली १५ वर्षे पंचशील मागासवर्गीय सामाजिक सेवा संस्था ए.डी पाटील साहेब सार्वजनिक वाचनालय, माजी आमदार सुजित मिणचेकर फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सामाजिक क्रीडा,शैक्षणिक, क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबवून एक नवी दिशा देण्याचं काम करत आहेत, मुलांना गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या वाटप ,संस्थेच्या माध्यमातून मुलांचा गौरव, मान सन्मान पत्र, साक्षरता अभियान ,बचत गटातील महिलांसाठी महिला सबलीकरण, साक्षरता अभियान, हळदीकुंकू समारंभ आयोजन, झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरण संतुलन या संस्थे मार्फत प्रत्येक वर्षी अडीचशे ते तीनशे वृक्ष झाडांचे वाटप ,आरोग्य शिबिर ,रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी शिबिर, अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम गेली पंधरा वर्षे राबवत आहेत.
या कार्याची दखल म्हणून तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थेने औरंगाबाद येथे पत्रकार संभाजी कांबळे यांना समाज भुषण पुरस्कार बहाल केला…
यावेळी या संस्थेचे संस्थापक. दिग्दर्शिका , गायक,लेखक,व पहाट चित्रपटाचे निर्माते मेघा डोळस,ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ. ऋषिकेश कांबळे . दैनिक पुण्यनगरी चे उपसंपादक बाबुराव जुबडे, रतन साळवे, संदीप जाधव, वैभव काल खैर, कांचन सदाशिवे. आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार प्रधान करण्यात आला.