विधवा महिलांच्या कायदेशीर समस्या व अधिकार याविषयी चर्चासत्र संपन्न; मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचा पुढाकार.

कोल्हापूर :
मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार आणि श्रीमती व्ही. व्हीं. जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच , माननीय श्री.पंकज देशपांडे ,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांचे सूचनेनुसार दि.७/०१/२०२२ ई . रोजी विधवा महिलांच्या कायदेशीर समस्या व अधिकार याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी स्वयंसेवक गौतमी चव्हाण यांनी केले. तसेच ॲड.सौ. योगिता रणजित हरणे यांनी विधवा महीलाचे कायदेशीर समस्या व त्यांचे अधिकार याविषयी माहिती दिली. सदर चर्चासत्रामध्ये विधवा महिलांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.विधी स्वयं सेवक निलोफर शेख यांनी विधवा महिलांना विविध पेन्शन मिळतात त्या मिळण्यासाठी कोणकोणते नियम आहेत या संदर्भात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सागवडेवाडी ग्रामपंचायतीच्या सी.आर.पी.वैशाली चव्हाण यांनी केले.तसेच सदर कार्यक्रमा मध्ये ३५ महिला उपस्थित होत्या.चर्चासत्राचे आभार प्रदर्शन विधी स्वयं सेवक फ्रान्सिसका डिसोझा यांनी केले.