ताज्या बातम्यामहाराष्ट्र

15 ते 18 वर्ष वयोगटातील 9 हजार 318 विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात लसीकरण

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

कोरोना प्रादुर्भाव व ओमायक्रॉन विषाणू प्रतिबंधाच्या दृष्टीने आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना शाळा व महाविद्यालयाच्या ठिकाणी कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील 9 हजार 318 विद्यार्थ्यांचे आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी फारुख देसाई यांनी दिली.
विवेकानंद कॉलेज व कमला कॉलेज येथील लसीकरण केंद्रांना आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देवून लस घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यात आज अखेर 18 वर्षावरील 92 टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस व 68 टक्के लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजपासून लसीकरण सत्रे सुरू करण्यात आली असून सन 2007 पूर्वी जन्मलेले लाभार्थी लसीकरणास पात्र आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks