चार एप्रिलपर्यंत बँका फक्त ‘या’ दोन दिवशी सुरु राहणार ; वाचा बँका कधी बंद आणि कधी सुरू राहणार ?

टीम ऑनलाईन :
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील 4 आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील 3 असे मिळून एकूण 7 दिवस बँकाचे कामकाज बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना एटीएम केंद्राचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र सतत आलेल्या या सुट्ट्यांमुळे एटीएमबाहेर रांगा लागण्याची शक्यता आहे. शिवाय एटीएममध्ये खडखडाट देखील होऊ शकतो. यामुळे बँकेत पैसे असूनही अनेकांचा खोळंबा होऊ शकतो.
बँका कधी बंद आणि कधी सुरू राहणार?
27 मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
28 मार्च – रविवार असल्याने बँक हॉलिडे असेल.
29 मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.
30 मार्च – यादिवशी बँका सुरू राहतील.
31 मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
1 एप्रिल – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
2 एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील.
3 एप्रिल – या दिवशी बँका सुरू राहतील.
4 एप्रिल – बँकांना रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी असेल.
त्याचबरोबर एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना पुढील महिन्यांपासून आणखी एक समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) शुक्रवारी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संदेशाबाबत नियामक निकषांची पूर्तता न करणाऱ्या 40 ‘डिफॉल्टर्स’ कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. ट्राय कडून या प्रमुख घटकांना बर्याच वेळा माहिती देण्यात आली आहे. यात एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.
ट्रायने 31 मार्च 2021 पर्यंत हे नियम पाळले पाहिजेत, असे नमूद करून या विषयावर ट्रायने कठोर भूमिका घेतली आहे. तसे नसल्यास, 1 एप्रिल 2021 पासून ग्राहकांशी त्यांचे संवाद व्यत्यय आणू शकतात. नियामकाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रमुख युनिट / टेली मार्केटिंग कंपन्यांना नियामक आवश्यकता पूर्ण करण्याची पुरेशी संधी देण्यात आली आहे. ग्राहकांना पुढे नियामक फायदे नाकारले जाऊ शकत नाहीत. हे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे की 1 एप्रिलपासूनच्या संदेशाने नियामक आवश्यकतांचे पालन केले नाही तर ते सिस्टमद्वारे थांबवले जाईल.