भोगावाती कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. दादासाहेब पाटील (कौलवकर) यांच्या पुण्यतिथीनिमित्त कौलव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

कौलव प्रतिनिधी :
भोगावती परिसराचे भाग्यविधाते गोरगरिबांचे कैवारी तसेच श्री भोगावती सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक चेअरमन कै दादासाहेब कृष्णराव पाटील कौलवकर यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त कौलव तालुका राधानगरी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे
दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारी पुण्यतिथी गेले दोन वर्ष कोरोना चा संसर्ग असल्यामुळे साध्या पद्धतीने साजरी होत राहिली
आता मात्र को राणा संसर्ग कमी असल्यामुळे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये भव्य संगीत भजन स्पर्धा, भव्य एकांकिका स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच खाद्य महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन धैर्यशील दादा कौलवकर फाउंडेशन कौलव यांच्या वतीने करण्यात आले आहे वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन 22,23,24 डिसेंबर रोजी मारुती मंदिर कौलव येथे करण्यात येणार आहे