ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : गुजरीतील सराफाकडून कोट्यावधींची लुबाडणूक

कोल्हापूर :

सोन घरात ठेवून दोन होणार नाहीत. माझ्याकडे द्या, त्याचा चांगला परतावा तुम्हाला देतो असे म्हणून गोरगरीब, सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांकडून घेतलेले सोने परत दिलेले नाही. सोने मागितले तर मी एक प्रॉपर्टी विक्री केली आहे, त्याचे पावणे तीन कोटी रुपये येणार आहेत. आल्यानंतर मी तुम्हाला तुमच्या सोन्याच्या बदल्यात ते पैसे देतो असे सांगून कोल्हापुरातील एका सराफाने अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे. सोन्याच्या बदल्यात दिलेले अनेक चेक बॅंक खात्यात पैसे नसल्याने वटलेले नाहीत. आता याच सराफाकडून लॉकडाऊनचे कारण देत लोकांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. बालिंगा येथील एका सराफाने अशीच फसवणूक करुन तो फरारी झाला आहे, यावरूनच कोल्हापूरातील या सराफाचा विषय चर्चेत आला आहे.

गुजरीतील सराफाकडून सोन्याचे दागिने करायला घेतलेली ऍडव्हान्सही हडपली आहे. गहाण ठेवलेले दागिने मोठ्या बॅंकेत ठेवून त्यावर कर्ज काढून मूळ मालकाची फसवणूक केली आहे. याशिवाय दागिने दुरूस्त करण्यासाठी म्हणून घेतलेले दागिने पाच ते सहा महिने परत दिलेले नाहीत. या सराफाच्या विश्‍वासावर राहून मुलीच्या लग्नाच्या दागिन्यासाठी दिलेली ऍडव्हान्सही गायब आणि सोनेही दिलेले नाही.
अनेकांना लग्नाच्या आदल्यादिवशीपर्यंत सोने देतो म्हणून सांगितो, पण दिलेला शब्द पाळत नाही. यातूनही तो सराफ पैसे घेतलेल्या ग्राहकांला दागिने लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर घेवून जा, असे सांगतो. पण तरीही तो दागिने देत नाही. त्यामुळे या सराफाच्या फसवणूकीमुळे मुलींच्या लग्नातच वडिलांना मान खाली घालयची वेळ आणली आहे. अशा सराफांमुळे प्रामाणिक आणि विश्‍वासाने काम करणाऱ्या सराफांना गालबोट लागले जात आहे.

पाच ते सहा वर्षे दागिने दिले जात नाही

एक-एका ग्राहकाचे सोन्यावर जादा परतावा देतो म्हणून घेतलेल्या ग्राहकांचे सोने पाच ते सहा वर्ष परत केले दिलेले नाहीत. तसेच, त्याचे व्याज किंवा परतावा ही दिलेला नाही. सोन्याची किंमत कमी आहे, किंमत वाढल्यानंतर तुम्हाला घेतलेले सोने विकून जास्त पैसे देतो, असे सांगत पाच ते सहा वर्षापासून टोलवाटोलवी करत आहे.

भांडण करत आलेल्या ग्राहकांना त्याने सोन्याच्या किंमतीऐवढा बॅंक चेक दिलेले आहेत. मात्र, ग्राहकाने हाच चेक त्याच्या खात्यावर भरला तर तो चेक वटलेले नाहीत. असे अनेक ग्राहक आता या सराफाविरूध्द पोलीसात फिर्याद देण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks