मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

मुंबई प्रतिनिधी :
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने काही मिनिटांपूर्वीच ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
तेंडुलकरने स्वत:ला घरामध्ये क्वारंटाईन केलं आहे. त्याचबरोबर सर्व प्रोटोकॉल आणि डॉक्टरांच्या सल्ला याची अंमलबजावणी करत आहेत. सचिन तेंडुलकरचा परिवार कोरोनापासून सुरक्षित आहे. सचिन कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने कोरोना टेस्ट केली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.
सचिन तेंडुलकर म्हणाला, “मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. याशिवाय, मी या महामारीशी संबंधित सर्व आवश्यक प्रोटोकॉल फॉलो कर त आहे. मी सर्व हेल्थकेयर प्रोफेशनल्सना धन्यवाद देतो.”
गेल्या काही दिवसात मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. सचिनने नुकतेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज चॅलेंज वेट्रन्स स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.