सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात एनसीसी दिन उत्साहात साजरा

मुरगुड प्रतिनिधी :
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात एनसीसी दिन साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसी छात्रांनी कवायतीचे सादरीकरण करत पाहुण्यांची वाहवा मिळवली.
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कोल्हापूरचे ५६ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे युनिट सुरू झाले आहे.
एनसीसी दिनाच्या औचित्याने छात्रांनी प्रथमतः प्राचार्यांना गार्ड ऑफ ऑनर देत प्रशस्त मैदानावर ४५ मिनिटे कवायतीचे सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. कुंभार यांनी सर्व छात्रांचे सुंदर कवायतीचे कौतुक केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. त्यानंतर पायलट सुसमवेत महाविद्यालयाच्या प्रमुख आवारामध्ये महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार व उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी प्रा. विनोदकुमार प्रधान यांचा सत्कार केला.