कापशी : खड्डा खुदाई कारणावरून मारामारीत एक गंभीर जखमी ; दोघावर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल

मुरगूड प्रतिनिधी :
सामाईक परडयात खड्डा काढण्याच्या कारणावरून कापशी ता.कागल येथे झालेल्या मारामारीत दयानंद धोंडीबा बिरंबोळे हे गंभीर जखमी झाले . या प्रकरणी गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे या दोघावर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सौ . दिपाली दयानंद बिरंबोळे व गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे हे नात्याने भाऊबंद असून त्यांचा घराच्या वाटणीवरून वाद आहे. २३ मार्च रोजी रात्री १ वाजता दिपाली बिरंबोळे यांच्या सामाईक परडयात गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे तसेच गणेशचा सावत्र भाऊ योगेशे बिरंबोळे व गावातील राहुल भोळे, चिल्ल्या इंगळे, विजय तेलवेकर हे गणेशच्या संडासाचे बांधकाम करण्या करीता खड्डा काढत होते .
त्यावेळी दिपाली बिरंबोळे व तिचे सासू सासरे व पती दयानंद यांनी परडयाच्या वाटण्या करून खडडा काढा असे सांगत असताना गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे यांनी दयानंद बिरंबोळे व सासरा-धोंडीबा यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली . तसेच गणेश बिरंबोळे याने लोखंडी पार दयानंद बिरंबोळे यांच्या डोकीत मारल्याने ते गंभीर जखमी झाले . या प्रकरणी दोघावर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . अधिक तपास मुरगूड पोलिस स्टेशनचे पी.एस् आय ढेरे हे करीत आहेत .