ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे येथील राजमाता मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडिट सोसायटीच्या स्थानीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अशोक डवरी यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड (ता.कागल) येथील अखिल भारतीय नागपंथी डवरी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्षपद भूषविले तसेच जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अशोक केदारनाथ डवरी यांची पुणे येथील राजमाता मल्टीस्टेट को . ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुदाळतिट्टा ( ता- भुदरगड) शाखेच्या स्थानीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे .

ही निवड सोसायटीचे संचालक व मॅनेजिंग डायरेक्टर अशोक गावडे, संचालक तुकाराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली . या निवडीस सुचक म्हणून संचालक तुकाराम कोळी ( कोडणी )तर अनुमोदन स्थानीय सल्लागार समिती सदस्य विष्णूपंत खैरे ( मुरगूड ) यांनी अनुमोदन दिले .
या निवडीवेळी व्हॉईस चेअरमन कांचन भातडे , मॅनेजिंग डायरेक्टर अशोक गावडे, तुकाराम कोळी ( कोडणी ),श्रीकांत पाटील, अर्चना पाटील, विनोद काटकर , दत्तात्रय परीट, विठ्ठल मोरे उपस्थित होते .
अशोक डवरी यांनी यापुर्वी राजमाता मल्टीस्टेट को . ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुदाळतिट्टा ( ता- भुदरगड) शाखेच्या स्थानीय सल्लागार समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे . तसेच अखिल भारतीय नागपंथी डवरी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे .सध्या ते राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही काम पाहात आहेत . तसेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नऊ वर्ष मुख्याध्यापक, सात वर्ष केंद्रप्रमुख म्हणून काम केले आहे . जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांना गौरविले आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks