ताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंचलकरंजी : हद्दपार केलेल्या नेमिष्टे गँगच्या म्होरक्याला कोल्हापूर पोलिसांंचा दणका.

कोल्हापूर प्रतिनिधी :

तीन महिन्यांसाठी हद्दपार केलेल्या नेमिष्टे गँगच्या म्होरक्याला शहरात फिरताना पोलिसांनी पकडले. अक्षय नेमिष्टे असे त्याचे नाव असून त्याला इचलकरंजी मध्ये उत्तम प्रकाश चित्र मंदिर परिसरातून पोलीस उपाधीक्षक पथकाने ताब्यात घेतले आहे. गावभाग परिसरात दहशत असणाऱ्या या टोळीला दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील नेमिष्टे हा शहरात फिरताना आढळून आला आहे. त्यामुळे आता हद्दपार केलेल्यांवर करडी नजर पोलिसांना ठेवावी लागणार आहे

.शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करुन दहशत पसरविणार्‍या सराईत ‘नेमिष्टे गॅंगला’कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. या पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार टोळीप्रमुख अक्षय राजेंद्र नेमिष्टे, सदस्य गणेश बजरंग नेमिष्टे, राजेंद्र गजानन आरगे, शुभम राजेंद्र नेमिष्टे,सुंदर रमेश नेमिष्टे (सर्व रा.शेळके गल्ली) यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले. मात्र हद्दपारीचा कालावधीत संपायच्या आतच शहरात फिरताना आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक पथकाने त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks