ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा पोलीस ठाणेच्या वतीने दंगल काबूचे प्रात्यक्षिक

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
आजरा पोलीस ठाणेच्या वतीने पोलीस ठाणे ते एसटी बस स्थानकापर्यंत दंगल काबूचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
सदर प्रात्यक्षिक हे सद्या सुरू असलेले अंगणवाडी सेविकांचे आंदोलन,मराठा आरक्षण प्रश्न, ख्रिस्तमस सण या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी यासाठी सदर प्रात्यक्षिक एस टी बस स्थानक मध्ये करण्यात आले .
यामध्ये एक पोलीस अधिकारी, २० पोलीस अंमलदार ,रुग्णवाहिका,अग्निशमन वाहन, २ पोलीस वाहन व सशस्त्र पोलीस यांचा समावेश होता अशी माहिती गोपनीय अंमलदार अनिल तराळ यांनी दिली.