मुरगूड: महागाई विरोधात युवा सेनेची निषेध रॅली; मुरगूड येथे निषेध सायकल रॅली

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
देशात पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस यांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत . भरमसाठ वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. अशा वेळी झोपी गेलेल्या केंद्र सरकार चे लक्ष वेधण्यासाठी महागाई विरोधात युवा सेनेच्या वतीने मुरगूड येथे निषेध सायकल रॅली काढण्यात आली .
युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉ.सतिशजी नरसिंग, जिल्हायुवाधिकारी दिनेश कुंभीरकर यांचे मार्गदर्शनाखाली महागाई विरोधात निषेध सायकल रॅली मुरगूड येथे युवासेनेच्यावतीने काढण्यात आली.
या निषेध रॅलीला नितीन खराडे ( उपजिल्हा अधिकारी) , सुरेश पाटील (तालुका युवा अधिकारी) , शुभम चौगले (उपतालुका युवा अधिकारी), संभाजी घोरपडे (उपतालुका युवा अधिकारी), अविनाश चौगले (उपतालुका युवा अधिकारी) ,शिवाजी घोरपडे (तालुका समन्वयक), समिर देसाई (तालुका समन्वयक), कुंडलिक शिंदे (तालुका समन्वयक) ,पवन पाटील (शिवसेना कागल शहर प्रमुख) , वैभव आडके (शिवसेना विभाग प्रमुख) , सोहेल नदाफ , ओकांर खराडे , अनिल चौगले आदि उपस्थित होते.