ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आत्माराम वरूटे यांचे निधन.

सावरवाडी प्रतिनिधी :
गेली चार दशके कॉंग्रेस पक्षात कार्यरत असणारे करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त, व करवीर तालुका कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष आत्माराम दत्तात्रय वरुटे यांचे रविवारी रात्री एक वाजल्याच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने कसबा बीड परिसरात सर्व थरातून हळहळ व्यक्त होत आहे.
कॉंग्रेस नेते आमदार पीएन पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कॉंग्रेस पक्षात गेली अनेक वर्ष काम केले होते. गावातील विविध सहकारी संस्थेत त्यांनी काम केले. करवीर पंचायत समितीच्या माजी सदस्या आनंदी वरुटे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा , मुलगी असा परिवार आहे.