रेस्टॉरंट, खाद्यगृहे व इतर आस्थापनांना वेळ पाळणे बंधनकारक ; जिल्ह्यात अशी असणार नियमावली : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
आगामी सण हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांना मध्यरात्रीपर्यंत म्हणजे 12.00 वाजेपर्यंत आणि इतर सर्व आस्थापनांना रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.
याबाबत पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था / प्राधिकरण व कामगार विभाग यांनी रेस्टॉरंट्स, भोजनालय तसेच इतर सर्व आस्थापनांसाठी निर्धारित केलेल्या वेळा पाळणे बंधनकारक राहील.
यापूर्वी कोविड -19 व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारिरीक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल .