गांधी मैदान येथील महात्मा गांधीजी यांच्या स्मारकास पालकमंत्री सतेज पाटील व आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन; ‘मोबाईल टॉयलेट’ बसचे लोकार्पण.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमीत्त आज गांधी मैदान येथील महात्मा गांधीजी यांच्या स्मारकास पालकमंत्री सतेज पाटील साहेब व आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी कोल्हापूर महानगरपालिका व केएमटी यांच्यावतीने आणि कल्याणी क्लीनटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून तयार केलेल्या सर्व सोयींनीयुक्त ‘मोबाईल टॉयलेट’ बसचे व शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ६५ नव्या टिप्परचे लोकार्पण करण्यात आले.
कोल्हापूर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच शहरातील बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, सचिन चव्हाण, भूपाल शेटे, अर्जुन माने, आदिल फरास, सचिन पाटील, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, माजी नगरसेविका उमा बनछोडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.