कसबा बीड येथील बाराव्या शतकातील शंभो महादेव मंदीराची नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छता मोहिम

सावरवाडी प्रतिनिधी :
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्य धार्मिक स्थळे खुली होणार आहे . शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कसबा बीड ( ता . करवीर ) येथील बाराव्या शतकातील प्राचीन ऐतिहासिक शंभो महादेव मंदीर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली .
शारदीय नवरात्र उत्सवाला ७ ऑक्टोंबरपासून प्रारंभ होणार असून मंदीर स्वच्छा, मंदीर धुणे , आदि कामे धार्मिक स्थळाच्या परिसरात सुरू झाली आहेत.
मंदीर परिसरात प्राचीन शिलालेख , विरगळ स्मारक , महादेव मंदीर , सभाग्रह परिसर आदि परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली यावेळी करवीर पंचायत समितीचे सदस्य व कॉग्रेस नेते राजेंद्र सुर्यवशी , सरपंच सर्जेराव तिबिले, किसान सभेचे नेते दिनकर सुर्यवंशी , दिनकर गावडे , उद्योजक संदीप सुतार , पंढरी मोहिते, विलास चौगले , बाळू पाटील , सरदार जाधव , एकनाथ कुंभार , सुनिल देसाई , अशोक सातपूते आदिनी दिवसभर परिश्रम घेतले.