ग्रामस्थांने फडणवीसांना केला सवाल आणि …..?

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागात दौऱ्यासाठी आले होते. या दौर्यात फडणवीस यांच्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत चिखली आंबेवाडी या गावांना त्यांनी भेटी दिल्या.
आज दुपारी चिखली ग्रामस्थांची भेट घेऊन फडणवीस आंबेवाडी येथे ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आंबेवाडी तील हनुमान मंदिर या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गावातील समस्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी येथील गावातील ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मार्गी लावू असं बोलत असताना. एका स्थानिक ग्रामस्थांनी नेत्यांचे भाषण थांबवलं. म्हणाला.. चंद्रकांत पाटील मंत्री असताना या ठिकाणी पुनर्वसनाचा शब्द दिला होता त्याचं काय झालं? दोन वर्षे प्रशासन कुठे गेलं होतं असा प्रश्न उपस्थित केल्यावर सर्वांची बोलतीच बंद झाली. याची चर्चा आंबेवाडी चिखली गावात राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली.