म. गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रिजी यांच्या जयंती निमित्ताने अनुभवा आंतरिक शांती 17 भाषांमध्ये सहजयोग ध्यान ऑनलाईन कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी यूट्यूब वर लाईव्ह

बिद्री कोल्हापूर :
म. गांधी जी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंती निमित्ताने श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत
सहजयोग ध्यानकेंद्र प्रतिष्ठान पुणे येथुन ऑनलाईन योगाचा / ध्यानाचा भव्य कार्यक्रम शनिवारी दि. 2
ऑक्टोबर रोजी learningsahajayoga यूट्यूब चॅनेलवर 17 भाषांमध्ये लाईव्ह प्रसारीत केला जाणार
आहे. तरी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहजयोग समन्वयक स्वप्निल
धायडे यांनी केले आहे.
संपूर्ण देशभरामध्ये 17 विविध भारतीय भाषांमध्ये ऑनलाईन कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीच्या कार्यक्रमाचे निशुल्क प्रशिक्षण 2 ऑक्टोबर 2021 शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 5 सत्रांत आयोजित करण्यात आलेले आहे. प्रत्येक सत्र हे 60 मिनिटाचे असेल प्रथम सत्र सकाळी 9 ते 10 या वेळेत देववाणी संस्कृत भाषेमध्ये आणि उर्दू मध्ये असेल. त्यानंतर स. 10 ते 11 दरम्यान हिंदी, तेलगू तामिळ, गुजराती आणि स 11 ते दु 12 दरम्यान बंगाली, कन्नड, मल्याळम, आसामी या भाषेत असेल. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत मराठी, पंजाबी, भोजपुरी, ओडिया आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेत इंग्रजी, मैथिली, आणि सिंधी असे एकूण 17 भाषांमध्ये संपूर्ण भारत देशातील साधक www.sahajayoga.org.in या वेबसाईटवर वर आणि learningsahajayoga या युट्युब चॅनेल वर सहजयोगध्यान साधनेचा अनुभव घेऊ शकतील,
श्री माताजी निर्मलादेवी यानी 5 मे 1970 रोजी मानवातील सूक्ष्म शरीराद्वारे (स्व चे तंत्र ) कुंडलिनी शक्ति जागृत करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी सहजयोग ध्यान पद्धती सुरु केली. सहजयोग ध्यानाद्वारे सर्व समस्यांवर मात करण्याची शक्ति प्राप्त होऊन आंतरिक परिवर्तन सुलभ होते.
3 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत दररोज संध्याकाळी 5 वा मराठी आणि हिंदी भाषेतून सहजयोग ध्यान कार्यशाळा learningsahajayoga या युट्युब चॅनेल वर विनामूल्य घेतल्या जातील श्री माताजी निर्मलादेवी यांनी सुरू केलेल्या दैनंदिन सहजयोग ध्यानाद्वारे गेल्या पन्नास वर्षांत असंख्य सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून संतुलित आणि यशस्वी आयुष्य अनुभवत आहे. सहजयोग ध्यान साधना दररोज केल्याने शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक आणि बौद्धिक स्तरावर आंतरिक बदल होतात.
YouTube चैनल www.youtube.com/c/learningsahajayoga यावर हा निशुल्क कार्यक्रम सर्वांनी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हिंदी भाषेतून आणि मराठीत सायं 5 वा बघावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रं 1800 2700 800 वर संपर्क करावा असे आवाहन सहजयोग परिवारातर्फे कोल्हापूर जिल्हा समन्वयक राजेंद्र चौगले यांनी केले आहे.