लायकीत राहा अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ : माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा किरीट सोमय्यांना इशारा.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राज्यात मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना चांगलंच फैलावर धरलं आहे. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी काल कोल्हापूरात पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते मा. आमदार राजेश क्षीरसागर यांनी हा इशारा दिला आहे.
मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचं काही कारण नाही पण, मी त्यांना इशारा देतोय की, केंद्राकडून संरक्षण देऊन शिवसेनेवर बोलण्यापैक्षा तुझ्यात जर दम असेल तर असेल तर मुंबईत कुठेही सांग आणि माझ्यासोबत लढायला ये. तुला दाखवून देतो, शिवसेना काय आहे, असा इशारा मा. आमदार राजेश क्षीरसागर यांनी किरीट सोमय्या यांना दिला आहे.
केंद्राचं संरक्षण घेऊन फालतू बडबड करणं फार सोपं असतं म्हणून तू तुझ्या लायकीत रहा. पक्षाविषयी मातोश्रीविषयी काही बोलू नको. सत्ता आज असते, उद्या असते. उद्या जर केंद्रातली सत्ता गेली तर तुला फाॅरेनमध्ये पळून जावं लागलं, एवढं लक्षात ठेव, असंही राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,कोल्हापूरात पोहचताच सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीफ यांना तुरूंगात धाडणार असं सोमय्या म्हणाले आहेत. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरूवात झालीय, असं सोमय्या म्हणाले होते. त्यावर आता मा. आमदार राजेश क्षीरसागर यांनी हल्लाबोल केला आहे.