सिद्धनेर्ली येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा : नागरिकांची मागणी

सिद्धनेर्ली : शिवाजी पाटील
सिद्धनेर्ली येथील दुधगंगा नदी किनारा वर भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सिद्धनेली व दूधगंगा नदी किनारा येथे भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे प्रत्येक गल्ली-बोळात कुत्र्यांचे कळपच कळप फिरत आहे या कळपातील कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत रात्री-अपरात्री मोठ्यामोठ्याने विव्हळणे भुंकणे या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना वृद्धांना व महिलावर्गाला याचा मोठा त्रास होऊ लागला आहे शाळेला जाणारे विद्यार्थी यांना तर खूपच त्रास होत आहे कारण एक भटकी कुत्री मुलांच्या मागे तसेच सायकलच्या मागेही धावून जात आहेत तरी या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.
नदीकिनारा येते तर चायनीज ची दुकाने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याठिकाणी 40 ते 50 भटक्या कुत्र्यांचा कळपच आहे त्यामुळे हि कुत्री नेहमी रस्त्यावरच असतात त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता आहे .खराब चिकन खाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर धावून जात असतात त्यामुळे या भागातून जाताना वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी लागते या भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने ताबडतोब बंदोबस्त करावा यापुर्वी सर्व चिकन,चायनिज विक्रेतेना ग्रामंपंचायतीने फक्त नोटीस दिलेल्या आहेत पण परिणाम शुन्य आहे जे नियम पाळत नाहीत त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.