ताज्या बातम्याभारत
इंधन दरवाढ केल्याची केंद्राची कबुली; प्रतिलिटर पेट्रोलमागे ३३ रु, तर डिझेलमागे ३२ रु महसूल जमा

NIKAL WEB TEAM :
पेट्रोल आणि डिझेलचे दर सोमवारीही सलग १६ व्या दिवशी वधारलेलेच दिसून आले. त्यातच आता केंद्र सरकार इंधनविक्रीमधून मोठ्या प्रमाणात महसूल कमवत असल्याचा खुलासा खुद्द मोदी सरकारनेच केला आहे. अबकारी कर, उपकर आणि अधिभार या माध्यमातून इंधनविक्रीमधून केंद्राची घसघशीत कामाई होत असल्याची कबुली सरकारने दिली आहे.
याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये ६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे ३२ रुपये जमा होत आहेत.
ही कमाईची आकडेवारी अबकारी कर, उपकर आणि अधिभार या तिन्ही गोष्टी मिळून आहे. २०२० साली मार्च आणि मे महिन्यादरम्यानच्या दरांशी तुलना केल्यास या कालावधीमध्ये केंद्र सरकारला प्रति लिटर पेट्रोलमागे २३ रुपये तर डिझेलमागे १९ रुपये महसूल म्हणून मिळत होते.