तुर्केवाडी येथील अमन शेखने पटकावले सुवर्णपदक

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
भारतीय मिशन ऑलिम्पिक खेल संघ द्वारा मध्य प्रदेश येथील उजैन येथे घेण्यात आलेल्या चौथ्या नॅशनल चॅम्पियनशिप 2021 ऑगस्ट, मधे कबड्डी या खेळ प्रकारात , तुर्केवाडी तालुका चंदगड येथील अमन सलाउद्दीन शेख याने सुवर्णपदक प्राप्त करून तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविलेबद्दल त्याचे अभिनंदन होते आहे.
तसेच त्याला याठिकाणी अवॉर्ड ऑफ होनर ने सन्मानित करण्यात आले आहे.
आतापर्यंत अमन शेख याने जिल्हा स्तरिय ऑलिम्पिक खेल 2020, मधे सुवर्ण पदक पटकावले आहे.
2020 चे राज्य स्तरिय चॅम्पियन नॅशनल ऑलिम्पिक खेल 2021 (गोवा) या ठिकाणी त्याने सुवर्णपदक प्राप्त पटकावले असून नॅशनल अॉलंपिक खेल 2021 चा नंबर 1 चा कॉर्नर पटकावला आहे .
तर इंडिया कप 2021 दिल्ली (हरयानाचा) सर्वश्रेष्ठ सहभागी खेळाडू ठरला आहे .
त्याला यासाठी सौरभ पाटील सर कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले असून वडील सलाउद्दीन ,आई सौ राबिया,बहीण महेक ,आजी खैरून ,मामा शमशोदिन यांची प्रेरणा मिळाली असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.