गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांवर चाकू हल्ला , दोघे गंभीर जखमी; संशयीत आरोपी ताब्यात

मुरगूड प्रतिनिधी :

मुरगूड येथील माधवनगरमध्ये स्वतः ची पत्नी ३ दिवस बेपता असल्याच्या कारणावरून गल्लीतील एकावर संशय घेवून त्याच्या घरामध्ये घुसून धारदार हत्यारांनी तिघांना जखमी केले यापैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर असून एक किरकोळ जखमी आहे . रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली नव्हती .

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार जखमींपैकी शंकर ईश्वरा गिरी (वय ३८ ) याच्या छातीच्या खाली डाव्या बाजूस खोल जखम झाली असून त्याच्या पाठीवरही हत्याराने जखम झाल्याने अति रक्तस्रावामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे तर त्याची आई शांताबाई ईश्वरा गिरी (वय ६५ ) त्यांच्या उजव्या बाजूला पोटाच्या खालच्या बाजूस खोलवर वार झाल्यामुळे त्याही गंभीर जखमी आहे . त्याच बरोबर शंकराची पत्नी मेघा शंकर गिरी (वय ३३ ) यांच्या छातीवर डाव्या बाजूस जखम वार लागल्याने त्याही जखमी आहेत संशयित आरोपी सचिन दिनकर मुरगूडे . (वय ४० ) हा फरारी झाला होता.पण रात्री उशिरा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व जखमींना सीपीआर कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करणेत आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks