मेघोली : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबधित सर्व घटकांवर दाखल करा : माजी आमदार के.पी.पाटील यांची मागणी.

कडगांव प्रतिनिधी :
मेघोली लघुपाठबंधारा फुटल्यामुळे झालेल्या जीवितहानी साठी संबंधित घटकांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
कालच्या या घटनेमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेला संबंधित खात्याचे सर्व अधिकारी जबाबदार आहेत, असे देखील पाटील म्हणाले.
या धरणाची गळती गेल्या अनेक वर्षांपासून चालू असून देखील याची गंभीर दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे आजचा हा प्रसंग ओढावला असल्याचे पाटील म्हणाले.
गेल्या वर्षभरापासून कोणीही कर्मचारी याठिकाणी कार्यरत नसल्यामुळे आजच्या या प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याचे पाटील म्हणाले.
झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी देखील माजी आमदार के. पी. पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी भुदरगड तालुका संघाचे बाळ देसाई, बिद्री कारखान्याचे संचालक मधुआप्पा देसाई, बिद्री साखर कारखान्याचे संचालक के. ना. पाटील, साखर कारखान्याचे माजी संचालक सुनील कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.