करवीर तालुक्यात पावसाअभावी भात पिके करपू लागली

सावरवाडी प्रतिनिधी :
महापुरानंतर तब्बल एक महिनाभर पावसाने दांडी मारली .नदी ,ओढे , नाल्यांच्या पाण्याच्या पातळी घटल्या गेल्या . शिवारात पाण्याचा थेंब सुध्दा नाही . बदलत्या पर्जन्यमानाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामावर झाला .आकाशातील फसव्या ढगांच्यामुळे बळीराजाची घोर निराशा होऊ लागली . महिनाभर पावसाअभावी करवीर तालुक्यात भातपिके करपू लागली आहेत.
यंदाच्या खरीप हंगामाला हंगामानुसार पावसाने साथ दिली नाही . एकीकडे महापूर अतिवृष्टी तर दुसरीकडे कडक उन्ह , महिनाभर पावसाने झुकांडी दिल्याने खरीप पिकांची स्थिती केविलवाणी झाली .भात ,ऊस ,ज्वारी, मिरची, भुईमुग, सोयाबिन रताळी,वरी, या सारख्या खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे
उत्पादन घटणार याची भितीही व्यक्त होऊ लागली . पावसाअभावी खरीप पिकांची स्थिती केविलवाणी झाली आहे . महापुराने कुजविले तर पावसाच्या उघडीपामुळे पिके करपली . या सत्य परिस्थितीमुळे बळीराजा मात्र चितांतूर बनला आहे . पावसाच्या उघडीपामुळे खरीप पिके करपू लागल्याचे चित्र करवीर तालुक्यात पहावयास मिळत आहे.