सोलापुर : शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न.

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या सोलापूर येथील जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार जयंत आसगावकर यांचे सोलापूर येथील संपर्क कार्यालय सुरू करण्याचा विचार आज प्रत्यक्षात आला आहे, याचा मनस्वी आनंद आहे. हा मतदारसंघ पाच जिल्ह्यांचा असून इथे आमदारांचे कार्यालय असावे या भावनेतून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडविण्यासाठी फायदा होणार आहे.
या उद्घाटनानंतर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिणींसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, अडीअडचणी समजावून घेतल्या. याचसोबत, कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सुद्धा शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी, – नामदार मंत्री सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूरष.ब्र.श्री. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, आमदार अरूण लाड, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, मा.आ.दिलीपराव माने, मा.आ.दीपक आबा साळुंखे, मा.आ. धनाजीराव साठे, मा. आ. विश्वनाथ चाकोते, जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, मुख्याध्यापक महामंडळ अध्यक्ष सुभाष माने, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, शिक्षक व सर्व संबंधित उपस्थित होते.