सुभाष कुंभार यांचा शेणगांव राष्ट्रवादी तर्फे सत्कार.

गारगोटी प्रतिनिधी :
शेणगांव (ता. भुदरगड) येथील युवक कार्यकर्ते सुभाष नामदेव कुंभार यांची भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ओबीसी सेल सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल शेणगांव राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून शाल, नारळ व फूल देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी बोलत असताना माजी तंटामुक्त अध्यक्ष मानसिंग तोरसे यांनी सुभाष कुंभार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिल कोरगावकर यांनी बोलताना, शेणगांव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवावा आणि आपल्या या पदाचा फायदा तळागाळातील लोकांसाठी करावा, असा मार्गदर्शन पर सल्ला सुभाष कुंभार यांना दिला.
केलेल्या सत्काराबद्दल सुभाष कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले व या पदाचा उपयोग नक्कीच गोरगरीब व गरजू लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करीन, असे वक्तव्य सत्कार प्रसंगी केले.
यावेळी माजी सरपंच व भुदरगड राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एन.डी.कुंभार, राजाराम कुंभार, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणपतराव जाधव, मानसिंग तोरसे, महावीर बोरगावे, गजानन कोळी, नंदकुमार वायचळ, महेश कालेकर, अमित कोरे, रमेश विभूते, किरण कुंभार, दिगंबर कुंभार, अनिल कोरगावकर यांच्यासह शेणगांव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.