ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी

मुंबई :
सातारा येथील काँग्रेस नेते भानुदास माळी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भानुदास माळी यांना निवडीचे पत्र देत शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांसह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.