ताज्या बातम्यामहाराष्ट्र

इचलकंरजी : ‘त्‍या’ तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

इचलकरंजी प्रतिनिधी :

येथील कत्तलखान्याच्या पिछाडीस झालेल्या तरुणाच्‍या खुनाचा छडा लावण्यात पोलिस उपाधीक्षक कार्यालयातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. सावज हेरून लुटमारी करणाऱ्या तिघांनी मुंबईतून आलेल्या तरुणाचा खात्मा केल्याचे तपासात उघड झाले.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, येथील कत्तलखान्याच्या पिछाडीस अज्ञात तरुणाचा खून करण्यात आला होता. दगडाने डोके ठेचल्याने त्‍याचा चेहरा ओळखता येत नव्हता. त्यामुळे मृताची ओळख पटवणेही मुश्किल बनले होते. त्यामुळे या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या. .

या शिवाय अन्य कोणतेही पुरावे न सापडल्याने मृताची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. परंतु हा प्रकार शांती नगर परिसरात ओपन बारमध्ये बसणाऱ्या काही तळीरामांनी केल्याचा संशय पोलिसांना होता. हा धागा पकडत सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया पोलिस पथकाने केली.
मृत व्यक्‍ती मुंबईहून हातकणंगले तालुक्यातील माणगावकडे येत असतानाच वाटेत त्याला लुटण्यात आले होते. या नंतर त्याचा अमानुष खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले . या प्रकरणी पोलिसांनी इचरकंजीतील तिघांना अटक केली आहे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks