ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कुंभी भोगावती संगमाच्या नदीपात्रात पकडला बारा किलो वजनाचा मासा पकडला
सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
बहिरेश्वर ( ता . करवीर ) येथील कुंभी भोगावती नद्यांच्या पात्रातील संगमा नजीक पात्रात बारा किलो वजनाचा मासा मच्छ व्यवसायीकाने आज रविवारी सकाळी पकडला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की बहिरेश्वर गावचे भोई समाजाचे मच्छ व्यवसायीक आनंदा आपटे हे नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी कुंभी – भोगावती नद्यांच्या पात्रात गेले होते . पात्रातील पाण्यात शनिवारी रात्री गळ टाकला होता . रविवारी सकाळी आनंदा आपटे गळ काढण्यासाठी नदीपात्रात उतरले होते . गळ काढीत असतांना गळाला बारा किलो वजनाचा पाणगा जातीचा मासा सापडला .
आनंदा आपटे यांनी गावात सापडलेला मासा आणून त्याचे वजन केले . बारा किलो वजन झाले . सव्वाचार फुट लांबीचा पकडलेला मासा पाहण्यासाठी नागरिकांची चौकात गर्दी उडाली होती .