ब्रेकिंग! राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट , मॉल्स ‘या’ तारखेपासून सूरू: आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई ऑनलाईन टीम :
ठाकरे सरकारच्या मंत्रींमंडळाची आज महत्वपुर्ण बैठक पार पडली. राज्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता.ज्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार १५ ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत, त्या संदर्भात जो आता निर्णय झालेला आहे, त्याबाबत मी सांगतो आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत रेस्टॉरंट उशीरापर्यंत सुरु ठेवण्याच्या शासन निर्णयाचे आहार (इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन) या रेस्टॉरंट चालकांच्या शिखर संघटनेसह इतर संघटनांनी मनापासून स्वागत केले आहे.
शासनाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यातील रेस्टॉरंट आता रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.
दरम्यान, ग्राहकांसाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.
या नव्या नियमांवर आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, रेस्टॉरंटमध्ये डायनिंग सेवेस रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने आनंद होत आहे.
शासनाच्या या निर्णयाचे नक्कीच स्वागत करावे लागेल.
रेस्टॉरंट चालवण्याच्या वेळेत वाढ करण्यासाठी संघटनेकडून सातत्याने मुख्यमंत्री आणि इतर निर्धारित मंत्री व अधिकाऱ्यांसोबत चर्चा व बैठकांचे सत्र सुरु होते.
या निर्णयामुळे संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
आम्ही आमच्या सदस्यांनाही नियमावलीचे कठोर पालन करताना आरोग्याची काळजी घेत सर्व संबंधित सरकारी यंत्रणाना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता लवकरच प्रशासनाकडून सर्वच निर्बंध लवकरच हटवले जातील आणि परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षा शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.