ताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्त्रियांच्या मताचा आदर केला पाहिजे : विजया कदम- पाटील

कुडूत्री प्रतिनिधी :

स्त्रियांच्या मतांचा आजकाल समाजात अजूनही आदर केला जात नाही.हा मोठा चिंतनाचा विषय असल्याचे मत शिक्षिका विजया कदम- पाटील यांनी व्यक्त केले. त्या राधानगरी येथे झालेल्या नुकत्याच टीचर्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्य बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा पालकर होत्या.
सौ.कदम -पाटील पुढे म्हणाल्या “आज पर्यंत सर्व सहन करत आलेला घटक म्हणजे स्त्री होय. महिलांची आज २१ ,व्या शतकात काय परिस्थिती आहे.हे आपल्या सर्वांना माहिती आहे.आज महिला खंबीर असणे गरजेचे आहे.शिवाय तिने कुटुंबाबरोबर स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे.तरच ती सक्षम पणाने आयुष्य जगेल.असेही सांगितले.यावेळी शितल मोरये यांनी महिलांना नोकरी करत असताना किती तारेवरची कसरत करावी लागते हे नमूद केले.
कार्यक्रमात महिलांकडून पारंपारिक स्पर्धा व विविध क्षेत्रात काम केलेल्या व शैलजा कानकेकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. संतोष टिपूगडे यांनी ही आपले अनमोल असे विचार मांडले. यावेळी केंद्रातील सर्व महिला उपस्थित होत्या.
शेवटी आभार निलिमा जाधव यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks