ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

देव दबडे यांची विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस भुदरगड तालुकाध्यक्षपदी निवड

गारगोटी :

गारगोटी शहरातील युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा वर्गाची सामाजिक चित्र पालटण्याची महत्वाकांक्षा अंगी बाळगून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले देव राजेंद्र दबडे यांची विध्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस भुदरगड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली.

भुदरगड प्रतिष्ठानच्या गारगोटी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या देव ने आजवर केलेले समाजकार्य खरंच कौतुकास्पद आहे. कोरोना काळातील कोविड सेंटर च्या मदतीपासून गारगोटीत उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी त्यासाठी अतिशय तळमळीने त्यांनी केलेलं कार्य खरोखर समाजाला दिशा देणारे आहे. गारगोटी शहरातील देव मोबाईल शॉपीचे मालक राजू दबडे यांचे ते चिरंजीव असून कॉलेचे विध्यार्थी आणि गारगोटीत असणारा प्रचंड युवावर्गाचा संपर्क त्यांच्या सामाजिक कार्यात वेगळा ठसा उमठविन्यात नक्कीच मदत करतो. असा शिलेदार राष्ट्रवादी विध्यार्थी संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी असला तर नक्कीच राष्ट्रवादी पक्षाला उभारी मिळेल हे ओळखून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील ,बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील,मधुकर देसाई (आपा )राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड झाली.

जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत यांनी ही निवड जाहीर केली.

या निवडीमध्ये गोकुळचे नवनिर्वाचीत संचालक रणजित पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार गारगोटी शहर अध्यक्ष शरद मोरे, सचिन बाबा देसाई, अजित देसाई, अमित देसाई, शेखर देसाई ,जयवंत गोरे, विजय आबिटकर, बोरवडेकर सर,दिंडेवाडी उपसरपंच अशोक गुरव,युवा नेते सचिन पाटील ह्यांचे सहकार्य लाभले तर या निवडीसाठी सर्जेराव देसाई (दादा) सरपंच म्हसवे,संतोष मेंगाणे पदवीधर जिल्हा अध्यक्ष ,युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव आनंद देसाई पदवीधर भुदरगड तालुका अध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks